शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाची नवीन योजना
शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. शिंदे शिवसेना आणि भाजप सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.
केंद्रातील पीएम किसान सन्मान निधी
योजनेंप्रमाणेच, राज्यातही नमो
शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र
फडणीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली.
या योजनेंतर्गत राज्य सरकार प्रत्येक शेतकऱ्याला ६ हजार रुपये प्रति वर्षी देणार आहे. त्यासाठी ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजेनंतर्गत भर घालण्याच्या उद्देशाने यात राज्य सरकारची भर पडणार आहे. त्यामुळे राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांच्याकडून प्रत्येकी सहा हजार याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात आता १२ हजार रुपये जमा होणार आहेत.
या योजनेचा लाभ १.१५ कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे.
No comments:
Post a Comment