जर करदात्याचा अतिरिक्त प्राप्तिकर कापला गेला असेल तर प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करून इ-व्हेरिफिकेशन (e-verification) केल्यानंतर ती रक्कम म्हणजे अतिरिक्त कापला गेलेला प्राप्तिकर करदात्याच्या खात्यात जमा होतो. यालाच आपण इन्कम टॅक्स रिफंड (Income Tax Refund) असं म्हणतो.
आपण टीडीएस किंवा टीसीएस किंवा अॅडव्हान्स टॅक्स किंवा सेल्फ असेसमेंट टॅक्सच्या रुपात जी अतिरिक्त रक्कम कर रुपाने प्राप्तिकर विभागाकडे जमा करतो, त्याबाबत प्राप्तिकर विभाग आपण प्राप्तिकर विवरणपत्र जमा केल्यानंतर त्याची आकेडमोड (कॅल्क्युलेशन) करतो. त्यानंतर अतिरिक्त रक्कम आपल्याला परत करण्याची प्रक्रिया केली जाते.
आपण प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना जमा केलेली किंवा दाखवलेली सर्व प्रकारची कर वजावट किंवा डिडक्शन आणि कर सवलत लक्षात घेऊनच प्राप्तिकर विभाग आपल्यावरील प्राप्तिकराचे कॅल्क्युलेशन करत असतो.
करदात्यानं प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) जमा केल्यानंतर इ-वेरिफेकिशन (e-verification) केल्यानंतरच आपण जमा केलेला अतिरिक्त प्राप्तिकर परत होण्याची म्हणजेच रिफंडची प्रक्रिया सुरू होते.
प्राप्तिकर विभागाने त्यांच्या पोर्टलवर रिफंड संदर्भातील माहिती दिली आहे. त्यानुसार सर्वसाधारणपणे करदात्याने प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्यानंतर 4-5 आठवड्यात त्याच्या खात्यात इन्कम टॅक्स रिफंड जमा होतो, मात्र जर या कालावधीत तुमच्या खात्यात रिफंडची रक्कम जमा झाली नाही, तर तुम्ही तुमचे प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना काही चूक तर झालेली नाही ना, हे तपासलं पाहिजे.
प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना तुम्ही दिलेल्या ई-मेलवर प्राप्तिकर विभागाकडून रिफंडसंदर्भात काही सूचना किंवा नोटिफिकेशन तर आलं नाही हे तपासून घेणं गरजेचे आहे. बँक खात्यात रिफंडची रक्कम जमा होण्यास 4-5 आठवड्यांचा कालावधी लागतो.
इन्कम टॅक्स विभागाच्या पोर्टलवर रिफंड स्टेटस तपासण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत-
- योग्य युजर आयडी, पासवर्ड
- आधार कार्डला लिंक्ड केलेला पॅन नंबर ( आधार क्रमांक किंवा पॅन क्रमांक वापरून या पोर्टलवर लॉगिन करता येतं)
- रिफंडचा दावा करणारे प्राप्तिकर विवरणपत्र
- इ-फायलिंग पोर्टलवर जा आणि लॉगिन वर क्लिक करा.
- योग्य युजर आयडी आणि पासवर्ड टाका.
No comments:
Post a Comment