★ हृदय (Heart)
◆ मानवी हृदय हे उरोभागात दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि छातीच्या हाडाच्या मागे स्थित असते.
ते तंतोतंत मध्यभागी नसून काहीसे तिरकस आणि डावीकडे असते.
★ वजन :
◆ पुरुष – ३४० ग्रॅम, स्त्री – २५५ ग्रॅम्स
★ वजन :
◆ पुरुष – ३४० ग्रॅम, स्त्री – २५५ ग्रॅम्स
★ कार्य :
◆ हृदय हे रक्तभिसरण संस्थेचे महत्वाचे इंद्रिय आहे, आकुंचन व प्रसारणाद्वारे रक्ताचे संपूर्ण शरीरात अभिसरण घडवून आणणे, हे त्याचे प्रमुख कार्य आहे.
◆ हृदय हा एक स्नायूंचा पंप (Muscular Pump) आहे. त्याची पंपिंग क्षमता (Pumping Capacity) 0.2 HP इतकी असते.
◆ हृदयाचा आकार साधारणपणे त्रिकोणाकृती असून त्याचे आकारमान हाताच्या मुठीएवढे असते, ते हृत्स्नायू (Cardiac Muscles) नी बनलेले असते आणि त्यावर ह्रद्यावरण (Pericardium) हे संरक्षणात्मक दुहेरी आवरण असते.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
★ हृदयाची रचना:
◆ मानवी हृदयात एकूण चार कप्पे व पाच झडपांचा समावेश होतो. वरच्या बाजूस दोन अलिंद व खालच्या बाजूस दोन निलय असे कप्पे असतात. अशा रीतीने चार कप्प्यांमध्ये मानवी हृदय विभाजित होते.
१) डावी कर्णिका/अलिंद (Left Autrium)
२) उजवी कणिका/ अलिंद (Right Autrium)
3) डावी जवनिका /निलय (Left Ventricle)
४) उजवी जवनिका/ निलय (Right Ventricle)
यांचा समावेश होतो.
◆ अलिंदांच्या भिंती पातळ असतात, तर निलय जाड भिंतीची बनलेली असतात.
◆ वरची दोन अलिंदे एका पातळ स्थायुमय पटलाने विभक्त झालेली असतात. त्यास अंतरकालिंदी पट (Inter -Artrial Septum) असे म्हणतात.
◆ खालची दोन निलये मात्र जाड अंतरनिलयी पटलाने (Inter-Ventricular Septum) विभागलेली असतात.
◆ उजव्या अलिंदात पुढील तीन रक्तवाहिन्यांद्वारे ऑक्सिजनविरहित (Deoxygenated) रक्त आणले जाते.
१) ऊर्ध्व शिरारक्त गुहा (Superior Vena Cava),
२) अधोशीरा रक्त गुहा (Inferior Vena Cava) आणि
३) परिमंडली शिरानाल (Coronary Sinus)
◆ उजवे अलिंद आणि उजवे निलय यांमधील रक्तप्रवाह त्रिदली झडपांच्या (Tricuspid Valve) च्या साहाय्याने नियंत्रित केले जाते.
◆ उजव्या निलयाच्या वरील भागाकडून फुफ्फुस धमनी (Pulmonary Artery) निघते.
◆ उजव्या अलिंदातून उजव्या निलयात आलेले ऑक्सिजनयुक्त रक्त तिच्यामार्फत फुफ्फुसांकडे वाहून नेले जाते.
◆ डाव्या अलिंदात फुफ्फुस शिरांची (Pulmonary Veins) चार रंध्रे उघडतात, त्यांद्वारे ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुसांकडून डाव्या अलिंदात आणले जाते.
◆ डावे अलिंद आणि डावे निलय यांच्यातील रक्तप्रवाह द्विदली (Bicuspid) किंवा मिट्रल झडप (Mitral Valve) च्या साहाय्याने नियंत्रित केले जाते.
◆ डाव्या निलयाच्या वरच्या आतील भागापासून एक प्रमुख धमनी निघते, जिला महाधमनी (Aorta) असे म्हणतात.
◆ डाव्या अलिंदातून डाव्या निलयामध्ये आलेले ऑक्सिजनयुक्त रक्त तिच्यामार्फत शरीराच्या विविध अवयवांना पुरविले जाते.
◆ हृयाच्या स्नायूंना परिहृद धमनी (Coronary Artery) द्वारे रक्त पुरविले जाते.
◆ हृदयातील झडपांमुळे रक्त एकाच दिशेने प्रवाहित केले जाते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
★ हृदयाची कार्यपद्धती :
◆ अलिंदांचे व निलयांचे लयबद्ध आकुंचन व प्रसरण सतत होत असते. (Rhythmic Contraction And Relaxation Of the Auricles And Ventricles) मात्र अलिंद व निलय एकाच वेळी आकुंचन किंवा प्रसरण पावत नाही.
◆ ज्यावेळी अलिंदे आकुंचन पावलेली असतात त्यावेळी निलये मात्र प्रसरण पावलेली असतात. त्याचप्रमाणे, ज्यावेळी निलये आकुंचन पावलेली असतात त्यावेळी अलिंदे प्रसरण पावलेली असतात.
◆ हृदयाच्या आकुंचनाला Systole म्हणतात, तर हृदयाच्या प्रसारणाला Diastole म्हणतात.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
★ हृदयाचे ठोके (Heart Beats):
◆ हृदयाचे एकदा आकुंचन व प्रसरणाचे एकचक्र म्हणजे हृदयाचा एक ठोका होय.
◆ एका ठोक्यासाठी ०.८ सेकंद लागतात.
◆ प्रौढ व्यक्तींमध्ये – 72 ठोके / मिनिट
◆ झोपेत असताना – ५५ ठोके / मिनिट
◆ लहान मुलांमध्ये – १२०-१६० ठोके/ मिनिट
◆ हृदयाच्या ठोक्यांची सुरुवात (Origin Of heart Beat) – ठोक्याची सुरुवात उजव्या कर्णिकेवरील Sino-Auricular node (S-A Node) मध्ये होते. त्याला pacemaker असे म्हणतात.
◆ हृदयाच्या ठोक्यांचा दर अनियंत्रित असेल तर तो नियंत्रित करण्यासाठी Pacemaker नावाचेच इलेक्ट्रिक यंत्र शरीरात त्वचेखाली बसवतात.
◆ ठोके मोजण्यासाठी Sthethescope वापरला जातो.
◆ ठोक्यांच्या स्पंदनांचा आलेख काढण्यासाठी ECG (Electro Cardio Gram) चा वापर केला जातो.
◆ अनियमित ठोक्यांच्या निदानासाठी
1) ECG – ठोक्यांच्या स्पन्दनांचा आलेख
2) CT Scan – Computerised Tomography
3) MRI – Magnetic Resonance Imaging
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
★ रक्तदाब (Blood Pressure) :
3) MRI – Magnetic Resonance Imaging
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
★ रक्तदाब (Blood Pressure) :
◆ रक्तदाब Sphygmomanometer मध्ये मोजतात. साधारण रक्तदाब (Normal B.P.) = 120/80 mm Of Hg असतो.
◆ तर हृदयाच्या प्रसरणाच्या वेळी तो 80 mm of Hg असतो.
◆ उच्च रक्तदाब (High B.P.) = 160/95 mm of Hg पेक्षा जास्त
◆ कमी रक्तदाब (Low B.P.) = 100/60 mm of Hg पेक्षा कमी
■ रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब उतरत्या क्रमाने पुढीलप्रमाणे असतो.
◆ धमनी - केशवाहिन्या – शिरा / नीला
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
★ रक्तभिसरणाचा मार्ग:
◆ शरीरात हृदयाच्या एका ठोक्यादरम्यान हृदय रक्ताभिसरणाच्या दोन क्रिया घडवून आणते ;
अ) फुफ्फुस रक्तभिसरण ब) देह रक्तभिसरण
१) फुफ्फुसी रक्तभिसरण (Pulmonary Circulation):
◆ या क्रियेमध्ये ऑक्सिजनविरहित रक्त हृदयाकडून फुफ्फुसांकडे नेले जाते व ते जेथे ऑक्सिजनयुक्त झाल्यावर परत हृदयाकडे आणले जाते.
◆ या क्रियेत पुढील टप्पे येतात:
◆ शरीराच्या सर्व भागाकडून उजव्या अलिंदात आलेले ऑक्सिजनविरहित रक्त ->उजव्या निलयामध्ये ->तेथून फुफ्फुस धमन्यांद्वारे फुफ्फुसांकडे उच्च दाबाने पोहोचविले जाते -> फुफ्फुसांमध्ये वायूंची अदलाबदल होऊन रक्त ऑक्सिजनयुक्त बनते -> ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुस शिरांद्वारे हृदयाच्या डाव्या अलिंदाकडे येते.
------------------------------------------------------
२) देह रक्ताभिसरण (Systemic Circulation):-
◆ या क्रियेमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाकडून शरीराच्या सर्व पेशींकडे पोहोचविले जाते आणि पेशींकडून ऑक्सिजनविरहित आणि कार्बन डायॉकसाईडयुक्त रक्त जमा केले जाऊन ते हृदयाकडे परत आणले जाते.
◆ या क्रियेत पुढील टप्पे येतात:
◆ डाव्या अलिंदात जमा झालेले ऑक्सिजनयुक्त रक्त -> डाव्या निलयात उतरते -> जात भिंतींचे डावे निलय उच्च दाबाने त्यास महाधमनीत पाठवते -> तेथून ते शरीराच्या सर्व पेशींकडे पोहोचविले जाते->तेथे वायूंची अदलाबदल होते आणि ऑक्सिजनविरहित रक्त उर्ध्व आणि अधोशिरांद्वारे उजव्या अलिंदात जमा होते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
★ Heart Surgery:
◆ पहिले हृदय प्रत्यारोपण (1st Human-ti-Human Heart Transplant) 3 डिसेंबर 1967 मध्ये दक्षिण आफ्रिकेत ख्रिश्चन बर्नार्ड यांनी Groote Schuur Hospital येथे घडवून आणले.
◆ भारतातील पहिले हृदयाचे सफल प्रत्यारोपण डॉ. पी. वेणुगोपाल यांनी घडवून आणले.
◆ भारतातील पहिली Open Heart Surgery – Christian Medical Collage, Vellore (1959)येथे घडवून आणण्यात आली.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
★ हृदयरोग (Heart Diseases):
◆ जन्मतःच हृदयात दोष असणे (Congenital heart disease)-
◆ जन्मतःच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना Blue Baby असे म्हणतात. कारण, त्यांचे ओठ, नखे तसेच, त्वचा निळसर रंगाची बनते.
No comments:
Post a Comment