बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच SEBI ने गुंतवणूकदारांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित चॅटबॉट प्लॅटफॉर्म 'SEVA' लॉन्च केला आहे. हा चॅटबॉट नुकताच बीटा व्हर्जनमध्ये लॉन्च करण्यात आला असून गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेचा विचार करून तो पूर्णपणे तयार करण्यात आला आहे.
तुम्ही शेअर बाजारातील गुंतवणूकदार असाल तर हा चॅटबॉट तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. कारण आता तुम्हाला एका क्षणात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. कोणतीही फसवणूक झाल्यास तक्रार कशी करता येईल आणि ती सोडवण्याची प्रक्रिया कशी आहे अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हे चॅटबॉट चांगले काम करत आहे.
SEVA चॅटबॉटसाठी लिंक: https://shorturl.at/3xEty
SEVA चॅटबॉट SEBIच्या वेबसाइटवर वापरला जाऊ शकतो. तुम्ही ते Android आणि iOS वर SAARTHI मोबाइल ॲपमध्ये देखील वापरू शकता. सेबीने निवेदनात म्हटले आहे की चॅटबॉट Seva च्या बीटा आवृत्तीमध्ये अनेक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. हा चॅटबॉट सध्या सिक्युरिटी मार्केट, तक्रार निवारण संबंधित प्रश्नांची उत्तरे देतो.
सेबीने मागे जूनमध्ये सारथी ॲप लॉन्च केले होते. या ॲपमध्ये आर्थिक ‘कॅल्क्युलेटर’चा समावेश करण्यात आला होता. हे KYC प्रक्रिया, म्युच्युअल फंड, ETF, शेअर बाजारातील शेअर्सची खरेदी आणि विक्री, गुंतवणूकदार तक्रार निवारण यंत्रणा आणि ऑनलाइन विवाद निराकरण (ODR) इ. सेवांचा समावेश यात आहे. याव्यतिरिक्त, गुंतवणूकदारांना त्यांच्या वैयक्तिक वित्त नियोजनात मदत करण्यासाठी डिझाइन केलेले अनेक व्हिडिओ या ॲपवर उपलब्ध आहेत.
सेबी काय आहे?
सिक्युरिटीज ॲन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ( सेबी ) ही भारतातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे.
इतिहास
सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ची स्थापना सर्वप्रथम 1988 मध्ये सिक्युरिटीज मार्केटमध्ये नियमन करण्यासाठी गैर-वैधानिक संस्था म्हणून केली गेली. १२ एप्रिल 1992 रोजी ही एक स्वायत्त संस्था बनली आणि भारतीय संसदेने सेबी कायदा १९९२ संमत केल्याने वैधानिक अधिकार देण्यात आले. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या व्यवसाय जिल्ह्यात सेबीचे मुख्यालय असून अनुक्रमे नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि अहमदाबाद येथे उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम क्षेत्रीय कार्यालये आहेत.
No comments:
Post a Comment