Sunday, August 25, 2024

Cotton Subsidy : कापूस व सोयाबीन पिकांचे 5 हजार मिळाले का? ऑनलाईन चेक करा तुमच्या मोबाईलवर



कापूस व सोयाबीन पिकांचे 05 हजार मिळाले का? ऑनलाईन चेक करा तुमच्या मोबाईलवर


Cotton , Soyabean Subsidy : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रतिहेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येत आहे.

परळी (जि. बीड) येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या लाभाचे वाटप करण्यासाठी पोर्टलचे अनावरण झाले.

गेल्यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या दरात प्रचंड घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. अशा शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली होती.

त्यानुसार किमान एक हजार रुपये, तर दोन हेक्टरच्या मर्यादेत जास्तीत जास्त दहा हजार रुपये याप्रमाणे अर्थसाह्य देण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

ही मदत देण्यासाठी राज्य सरकारला एकूण ४ हजार १९४ कोटी रुपये ६८ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. यातील १ हजार ५४८ कोटी ३४ लाख रुपये कापूस, तर २ हजार ६४६ कोटी ३४ लाख रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहेत.

कापूस व सोयाबीन पिकाची मदत मिळाली की नाही ऑनलाईन कशी चेक कराल? 

१) पुढील अनुदान वेबसाईट लिंकवर क्लिक करून ओपन करा. https://scagridbt.mahait.org

२) सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला वरती लाल चौकोनात Disbursement Status वर क्लिक करा.

३) पुढे गेल्यावर Disbursement Status पेज दिसेल त्यात तूंच आधार नंबर व कॅप्चा कोड टाकून Get Aadhaar OTP वर क्लिक करा.

४) त्यानंतर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीचे अपडेट विषयीची सविस्तर माहिती तुम्हाला पाहायला मिळेल.

Friday, August 16, 2024

लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेच्या कोणत्या खात्यात येणार? आधार नंबर टाकून चेक करा

 


राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojna) राज्यभरातून अर्ज दाखल करण्यात आले असताना लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये येणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचा पहिला हप्ता काही महिलांच्या बँक खात्यात जमा देखील झाला आहे. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ घेत असाल तर हे पैसे नक्की कोणत्या खात्यात येणार हे तुम्हाला फक्त आधारकार्ड नं टाकून महाडिबीटीवर पाहता येणार आहे.

शासनाकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना थेट लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. या योजनेचे पैसे थेट महिलेच्या बँक खात्यात जमा होणार असे सांगण्यात आले आहे. मात्र, हे पैसे नक्की कोणत्या खात्यात जमा केले जाणार आहेत. अनेक लाभार्थी महिलांना ही रक्कम कोणत्या खात्यात जमा होणार आहे. याविषयी संभ्रम आहे. तुमच्याकडे बँकखाते क्रमांक नसेल तर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड क्रमांकावरूनही ही रक्कम तपासता येणार आहे.

तुमचे पैसे आधारकार्डवरील माहिती वरून येणार आहेत!

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हे डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. म्हणजेच तुमचा आधार क्रमांक वापरून तुमच्या बँक खात्यावर ही रक्कम येणार आहे. यासाठी कोणतीही बँक डिटेल्स तपासले जाणार नाही. कारण डीबीटी प्रणालीअंतर्गत एकाचवेळी मोठ्या प्रमाणात खात्यात रक्कम पाठविण्यात येत असते. यासाठी तुमचे आधारकार्ड नक्की कोणत्या बँकेला लिंक केले आहे हे तुम्हाला तपासण्याची आवश्यकता आहे.

कोणत्या बँकेला आधारकार्ड जोडलंय ते असं तपासा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अर्ज केलेल्या बऱ्याच जणांकडे एकाहून अनेक बँक खाती असल्याने नक्की कोणत्या बँक खात्यात आपली रक्कम जमा होणार आहे याबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतू डीबीटीमार्फत पैसे घेण्यासाठी तुम्हाला कोणत्यातरी एकाच बँक अकाऊंटला आधारकार्ड लिंक करता येते. 

सर्वप्रथम येथे या संकेतस्थळावर जा.

https://myaadhaar.uidai.gov.in/

यात तुमचा १२ अंकी आधारकार्ड क्रमांक टाकून लॉगइन करा.

आधार क्रमांक टाकल्याने तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. तो भरल्यानंतर त्यावर Bank Seeding Status असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा

यात तुमच्या आधारकार्डचे शेवटचे चार अंक दिसतील. आणि बँकेचे नाव दिसेल. आणि तुम्हाला तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे कळेल.

आधारकार्ड ज्या बँकेला लिंक आहे, त्याच खात्यावर लाभार्थी महिलेचे पैसे येणार आहेत.

व्हिडीओ साठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://youtu.be/icqQhRjmfrc

Sunday, August 11, 2024

चुकीच्या नंबरवर रीचार्ज झालंय ? टेन्शन नही लेनेका, असे परत मिळवा तुमचे पैसे !



आजकाल ऑनलाइन रिचार्जच्या जमान्यात कधी घाई घाईत आपण चुकीच्या नंबरवर रिचार्ज करतो. अशा वेळी काय करावे, ते जाणून घेऊया.

एक काळ असा होता की लोक दुकानात जाऊन मोबाईल रिचार्ज (mobile recharge) करण्यासाठी टॉप अप कार्ड खरेदी करायचे. त्यावेळी इंटरनेटही खूप महाग होते आणि दुकानदार हुशारीने रिचार्ज करायचे. पण जसजसा काळ बदलत गेला तसतशी नवनवीन तंत्रं (new technology) बाजारात येऊ लागली आणि आज घरबसल्या रिचार्ज करता येते. तुम्ही सहसा रिचार्जसाठी वेगवेगळे ॲप्स वापरत असाल. पण बऱ्याच वेळेस असं होतं की घाईघाईत आपण चुकीचं रिचार्ज (recharge on wrong number) करतो. जर रिचार्जची रक्कम लहान असेल तर लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु जर मोठी रक्कम असेल तर पैसे वाया गेल्याबद्दल त्रास होऊ शकतो.

पण जर चुकीच्या नंबरवर रिचार्ज केले असेल तर हे पैसे परत मिळू शकतात हे बहुतेकांना माहीत नसते. कदाचित तुम्हालाही याबद्दल माहिती नसेल. अशा वेळी काय करावे, तेच या लेखातून जाणून घेऊया.

चुकीचा नंबर टाकलात तर काय करावे ?

जर तुम्ही चुकून किंवा घाईघाईत चुकीच्या नंबरवर रिचार्ज केले असेल, तर तुम्ही ज्या टेलिकॉम ऑपरेटरचे सिमकार्ड वापरता त्याच्या कस्टमर केअरला लगेच कॉल करा आणि त्यांना सर्व माहिती द्या. म्हणजेच रिचार्ज कधी केले, रक्कम किती होती, कोणत्या कंपनीचा नंबर रिचार्ज झाला, कोणत्या ॲपद्वारे रिचार्ज करण्यात आले, अशी संपूर्ण माहिती द्यावी.

याशिवाय, तुम्ही हा संपूर्ण तपशील संबंधित कंपनीला ईमेलद्वारे पाठवू शकता, ज्यामुळे तुमचे पैसे परत मिळू शकतील. भारतातील बहुतेक लोक व्होडाफोन-आयडिया, जिओ आणि एअरटेलचे सिमकार्ड वापरतात, त्यांचा ई-मेल आयडी तुम्ही सहज मिळवू शकता. त्यांना मेलवरून व्यवस्थित माहिती पाठवू शकता.

टेलिकॉम कंपनीने ऐकलं नाही तर काय कराल ?

अनेक वेळा असंही दिसून येते की टेलिकॉम कंपन्या ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेत नाहीत आणि त्यावर दीर्घकाळ कोणताही रिप्लाय मिळत नाही. तुमच्या तक्रारीवरही दूरसंचार कंपनीने कोणतीही कारवाई केली नाही, तर तुम्ही ग्राहक सेवा पोर्टलवर तुमची तक्रार नोंदवू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही व्हॉट्सॲपद्वारेही तुमची तक्रार नोंदवू शकता. याशिवाय तुम्ही प्ले स्टोअरवरून कस्टमर सर्व्हिस पोर्टलचे ॲप डाउनलोड करून तक्रार दाखल करू शकता.

मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही वेळेवर तक्रार दाखल केलीत तरच तुमचे पैसे परत मिळती. तसेच ज्या क्रमांकावर रिचार्ज केले आहे त्या क्रमांकाशी तुमचा मोबाइल क्रमांक जुळणेही आवश्यक आहे. म्हणजेच एक किंवा दोन नंबरमुळे रिचार्ज चुकीच्या नंबरवर गेला असेल तर अशा परिस्थितीत पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते. जर संपूर्ण आकडा वेगळा असेल, तर अशा परिस्थितीत कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करते कारण बरेच लोक कंपनीला जाणीवपूर्वक त्रास देतात.

Thursday, August 1, 2024

AI देणार शेअर बाजाराशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे; सेबीने SEVA चॅटबॉट केला लॉन्च, असा होणार फायदा



बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच SEBI ने गुंतवणूकदारांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित चॅटबॉट प्लॅटफॉर्म 'SEVA' लॉन्च केला आहे. हा चॅटबॉट नुकताच बीटा व्हर्जनमध्ये लॉन्च करण्यात आला असून गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेचा विचार करून तो पूर्णपणे तयार करण्यात आला आहे.

तुम्ही शेअर बाजारातील गुंतवणूकदार असाल तर हा चॅटबॉट तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. कारण आता तुम्हाला एका क्षणात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. कोणतीही फसवणूक झाल्यास तक्रार कशी करता येईल आणि ती सोडवण्याची प्रक्रिया कशी आहे अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हे चॅटबॉट चांगले काम करत आहे.

SEVA चॅटबॉटसाठी लिंक: https://shorturl.at/3xEty

SEVA चॅटबॉट SEBIच्या वेबसाइटवर वापरला जाऊ शकतो. तुम्ही ते Android आणि iOS वर SAARTHI मोबाइल ॲपमध्ये देखील वापरू शकता. सेबीने निवेदनात म्हटले आहे की चॅटबॉट Seva च्या बीटा आवृत्तीमध्ये अनेक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. हा चॅटबॉट सध्या सिक्युरिटी मार्केट, तक्रार निवारण संबंधित प्रश्नांची उत्तरे देतो.

सेबीने मागे जूनमध्ये सारथी ॲप लॉन्च केले होते. या ॲपमध्ये आर्थिक ‘कॅल्क्युलेटर’चा समावेश करण्यात आला होता. हे KYC प्रक्रिया, म्युच्युअल फंड, ETF, शेअर बाजारातील शेअर्सची खरेदी आणि विक्री, गुंतवणूकदार तक्रार निवारण यंत्रणा आणि ऑनलाइन विवाद निराकरण (ODR) इ. सेवांचा समावेश यात आहे. याव्यतिरिक्त, गुंतवणूकदारांना त्यांच्या वैयक्तिक वित्त नियोजनात मदत करण्यासाठी डिझाइन केलेले अनेक व्हिडिओ या ॲपवर उपलब्ध आहेत.

सेबी काय आहे?

सिक्‍युरिटीज ॲन्ड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ( सेबी ) ही भारतातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे.

इतिहास

सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ची स्थापना सर्वप्रथम 1988 मध्ये सिक्युरिटीज मार्केटमध्ये नियमन करण्यासाठी गैर-वैधानिक संस्था म्हणून केली गेली. १२ एप्रिल 1992 रोजी ही एक स्वायत्त संस्था बनली आणि भारतीय संसदेने सेबी कायदा १९९२ संमत केल्याने वैधानिक अधिकार देण्यात आले. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या व्यवसाय जिल्ह्यात सेबीचे मुख्यालय असून अनुक्रमे नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि अहमदाबाद येथे उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम क्षेत्रीय कार्यालये आहेत.

Monday, July 29, 2024

इन्कम टॅक्स रिफंडचा स्टेटस कसा पाहाल? रिफंड कसा मिळवाल?

 जर करदात्याचा अतिरिक्त प्राप्तिकर कापला गेला असेल तर प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करून इ-व्हेरिफिकेशन (e-verification) केल्यानंतर ती रक्कम म्हणजे अतिरिक्त कापला गेलेला प्राप्तिकर करदात्याच्या खात्यात जमा होतो. यालाच आपण इन्कम टॅक्स रिफंड (Income Tax Refund) असं म्हणतो.

आपण टीडीएस किंवा टीसीएस किंवा अॅडव्हान्स टॅक्स किंवा सेल्फ असेसमेंट टॅक्सच्या रुपात जी अतिरिक्त रक्कम कर रुपाने प्राप्तिकर विभागाकडे जमा करतो, त्याबाबत प्राप्तिकर विभाग आपण प्राप्तिकर विवरणपत्र जमा केल्यानंतर त्याची आकेडमोड (कॅल्क्युलेशन) करतो. त्यानंतर अतिरिक्त रक्कम आपल्याला परत करण्याची प्रक्रिया केली जाते.

पण प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना जमा केलेली किंवा दाखवलेली सर्व प्रकारची कर वजावट किंवा डिडक्शन आणि कर सवलत लक्षात घेऊनच प्राप्तिकर विभाग आपल्यावरील प्राप्तिकराचे कॅल्क्युलेशन करत असतो.

करदात्यानं प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) जमा केल्यानंतर इ-वेरिफेकिशन (e-verification) केल्यानंतरच आपण जमा केलेला अतिरिक्त प्राप्तिकर परत होण्याची म्हणजेच रिफंडची प्रक्रिया सुरू होते.

प्राप्तिकर विभागाने त्यांच्या पोर्टलवर रिफंड संदर्भातील माहिती दिली आहे. त्यानुसार सर्वसाधारणपणे करदात्याने प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्यानंतर 4-5 आठवड्यात त्याच्या खात्यात इन्कम टॅक्स रिफंड जमा होतो, मात्र जर या कालावधीत तुमच्या खात्यात रिफंडची रक्कम जमा झाली नाही, तर तुम्ही तुमचे प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना काही चूक तर झालेली नाही ना, हे तपासलं पाहिजे.

प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना तुम्ही दिलेल्या ई-मेलवर प्राप्तिकर विभागाकडून रिफंडसंदर्भात काही सूचना किंवा नोटिफिकेशन तर आलं नाही हे तपासून घेणं गरजेचे आहे. बँक खात्यात रिफंडची रक्कम जमा होण्यास 4-5 आठवड्यांचा कालावधी लागतो.

त्याशिवाय इ-फायलिंग पोर्टलवर (eFiling portal) देखील करदाते त्यांच्या रिफंडचं स्टेटस (refund status) तपासू शकतात.

इन्कम टॅक्स विभागाच्या पोर्टलवर रिफंड स्टेटस तपासण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत-

  • योग्य युजर आयडी, पासवर्ड
  • आधार कार्डला लिंक्ड केलेला पॅन नंबर ( आधार क्रमांक किंवा पॅन क्रमांक वापरून या पोर्टलवर लॉगिन करता येतं)
  • रिफंडचा दावा करणारे प्राप्तिकर विवरणपत्र

रिफंड स्टेटस (refund status) कसे पाहावे?

  • इ-फायलिंग पोर्टलवर जा आणि लॉगिन वर क्लिक करा.
  • योग्य युजर आयडी आणि पासवर्ड टाका.
         युजर आयडी म्हणून पॅन नंबर किंवा आधार नंबरचा             वापर करता येतो.

जर एखाद्या करदात्यानं त्यांच्या पॅन नंबरला आधार नंबरशी लिंक केलं नसेल तर तिथे एक पॉप-अप मेसेज येतो.

आधार नंबरला पॅन नंबर लिंक न केल्यामुळे तुमचा पॅन नंबर तिथे वापरता येत नाही. म्हणजेच पॅन नंबरचा वापर करून लॉगिन करता येत नाही.

पॅन नंबर आधारशी लिंक करण्यासाठी लिंक नाऊ (Link Now) या बटणावर क्लिक करा.

जर तुमचा पॅन नंबर आधार नंबरशी आधीच लिंक झालेला असेल तर तुम्हाला तो पुन्हा लिंक करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे तुम्ही 'Continue' वर क्लिक करून पुढील स्टेपवर जाऊ शकता.

त्यानंतर 'Sevrvices' टॅबवर जा आणि तिथे 'Know Your Refund Status' येथे क्लिक करा.

तिथे तुम्हाला ज्या वर्षाच्या प्राप्तिकर विवरणपत्राच्या रिफंडचे स्टेटस तपासायचे आहे ते तुम्ही तपासू शकता.

तिथे ज्या असेसमेंट वर्षाचे रिफंड स्टेटस तपासायचे आहे ते असेसमेंट वर्ष निवडा. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा आपल्याला त्या ठिकाणी इन्कम टॅक्स रिफंड स्टेटस दिसेल.

जर तुमचा रिफंड देण्यात आलेला असेल तर तिथे असं दिसेल...


Note : 31 मार्च 2023 च्या आधीचे किंवा या दिवसाचे रिफंड स्टेटस तपासायचे असल्यास ते NSDL च्या वेबसाईटवर पाहता येईल.

रिफंडशी संबंधित सर्व प्रकारच्या शंकांचं निरसन करायचं असल्यास त्यासाठी रिफंड बँकरच्या (SBI) हेल्पलाइन नंबरवर कॉल करता येईल. त्यासाठी 18004259760 हा हेल्पलाइन नंबर आहे. जर तुमच्या बॅंक खात्याशी निगडीत काही अडचणी असतील तर तुम्ही बॅंकेच्या शाखेशी संपर्क करा.

रिफंडची रक्कम मिळण्यासाठी इ-फायलिंगच्या पोर्टलवर तुमच्या बॅंक खात्याची माहिती देण्यात आलेली असली पाहिजे. त्याचबरोबर IFSC Code, बॅंक खात्याचा क्रमांक, बॅंक खात्याशी निगडीत माहिती अपडेट केलेली असणं आवश्यक आहे.

Thursday, June 1, 2023

दहावीचा निकाल २ जूनला जाहीर होणार; कधी, कुठे व किती वाजता पाहाल रिझल्ट?

 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दिलेल्या माहितीनुसार उद्या म्हणजेच २ जून २०२३ ला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. २ जूनला दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. प्राप्त माहितीनुसार mahahsscboard.in वर ऑनलाईन पाहता येईल. याशिवाय mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर देखील निकाल उपलब्ध असेल.

Friday, April 14, 2023

डिलिव्हरी बॉय होण्यासाठी काय करावं लागतं; किती असतो पगार! वाचा सविस्तर.

 


कडक उन्हात जेव्हा तूम्ही एसी कारमधून प्रवास करत असता. तेव्हा तळपत्या उन्हात कोणाला तरी जेवण पोहोचवण्यासाठी धडपड करणारा डिलिव्हरी बॉय तूम्हाला नक्कीच कधीतरी दिसून आलेला असेल. तेव्हा त्याची दया येते आणि किती रूपये पगार असेल त्याला असा प्रश्न आपसुकच तुम्हाला पडला असेल.

जेव्हा एखादा नवा व्यवसाय बाजारात येतो. तेव्हा नव्या करिअरच्या संधी उपलब्ध होतात. आजकाल अनेक तरुण-तरुणी एक करिअर ऑप्शन म्हणून डिलिव्हरी करणाऱ्या या नव्या क्षेत्राकडे पाहात आहेत. यामूळेच खाद्य पदार्थ ग्राहकाच्या दारापर्यंत पोहोचवण्याच्या या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत.

आज जर तुम्ही मेट्रो शहरात रहात असाल तर तुम्ही कित्येक दिवस घराबाहेर न पडता सहज राहू शकतात इतके ऑनलाईन ऑर्डर करण्याचे पर्याय दिवसागणिक आपल्यासमोर येत आहेत.

आज ‘स्विगी’ या जपानी कंपनीचा ‘डिलिव्हरी बॉय’ हा एखाद्या खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचारी इतकी कमाई करतो हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. नोकरी करतांना मिळणाऱ्या सर्व सुविधा या ‘स्विगी’च्या ‘डिलिव्हरी बॉय’ला सुद्धा उपलब्ध असतात आणि म्हणूनच आज हजारो सुशिक्षित लोक पूर्ण वेळ किंवा ‘पार्ट टाईम’ या ‘स्विगी’ सोबत जोडले जात आहेत.

आज करिअरच्या ऑप्शनच्या दृष्टीने याची माहिती पाहुयात. या क्षेत्रात जाण्यासाठी किती पात्रता आहे? किती पगार आहे, तसेच कामाचे स्वरूप काय आहे हे पाहुयात.

शिक्षणाची अट

कोणत्याही ई-कॉमर्स कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयची नोकरी मिळवण्यासाठी आधी 10वी किंवा 12वी पास असावे लागता.तसेच तूमच्याकडे टु व्हिलर असायला हवी,अशी अट या कंपनीची असते.  

पात्रता

  • उमेदवार 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असावा.
  • त्याच्याकडे स्मार्टफोन असावा, स्मार्ट फोन कसा चालवायचा हे माहित असावे.
  • उमेदवाराकडे स्वत:ची बाईक असावी
  • बाईक किंवा बाईककडे सर्व कागदपत्रे असावीत.
  • ड्रायव्हिंग लायसन्स असायला हवे.
  • आधार कार्ड/पॅन कार्ड आणि बँक खाते असावे.

असे करा अप्लाय

तूमचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही ई-कॉमर्स कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयच्या नोकरीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता.

तुम्ही तुमच्या शहरा जवळच्या ई-कॉमर्स कंपनीच्या कार्यालयात जाऊन नोकरीबद्दल बोलू शकता किंवा ई-कॉमर्स कंपनीच्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.

जॉबसाठी अवश्यक कागदपत्रे

  • ड्रायव्हिंग लायसन्स असायला हवे
  • आधार कार्ड/पॅन कार्ड आणि बँक खाते असणे आवश्यक आहे.

कसे बनाल डिलिव्हरी बॉय

डिलिव्हरी बॉय बनण्यासाठी, पहिली 10वी किंवा 12वी उत्तीर्ण व्हा.

बाईक चालवायला शिका आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळवा.

ई-कॉमर्स कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयच्या जॉबसाठी अर्ज करा.

संबंधित कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन ऑफलाइन अर्ज करा.

तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज देखील करू शकता.

प्रत्येक शहरात/नगरात फ्लिपकार्ट, अॅमेझॉन सारख्या ई-कॉमर्स कंपनीचे कार्यालय किंवा केंद्र आहे.

तुमच्या शहरातील जवळच्या ई-कॉमर्स केंद्रावर जाऊन नोकरीसाठी अर्ज करा.

तुमच्याकडे डिलिव्हरी व्यक्तीची सर्व कौशल्ये असतील आणि डिलिव्हरी बॉयची जागा रिक्त असेल, तर तुम्हाला नोकरी मिळेल.

यासाठी कोणत्याही प्रकारची परिक्षा घेतली जात नाही. फक्त तुमच्या व्यक्तीमत्वाची चाचणी घेतली जाईल.

तूमच्याकडे गाडी नसेल तरी देखील तुम्ही काम करू शकता...

तुमच्याकडे स्वतःची गाडी असावी आणि तुमच्याकडे दुचाकी चालवण्याचा वाहन परवाना असावा या गोष्टी इतर आवश्यक पात्रता कंपनीने ठेवली आहे. स्वतःची गाडी नसेल, पण दुचाकी चालवण्याचा वाहन परवाना असेल तर स्विगी तुमच्यासाठी बाईक खरेदी करते आणि तुम्हाला मासिक हफ्त्याने उपलब्ध करून देते.

डिलिव्हरी बॉयला किती पगार असतो

कंपनी डिलिव्हरी बॉयला दरमहा 10,000 ते 15,000 रुपये वेतन देते. प्रत्येक पदार्थाच्या डिलिव्हरीसाठी प्रति किलोमिटर 5 ते 7 रुपये मिळतात. त्यामूळे महिन्यात तूम्ही जितकी फुड डिलिव्हरी कराल तितके रूपये तूम्हाला मिळतात. त्यामूळे पगाराचा आकडा स्थीर नसतो. वेळेनुसार ‘डिलिव्हरी बॉय’ला पैसे देण्याचं ठरवलं असेल तर ती रक्कम १ रुपये प्रति मिनिट अशी ठरवली जाते.

पार्ट टाईम कामासाठी किती मिळतात

डिलिव्हरी बॉय हा जॉब तूम्ही पार्ट टाईम कामासाठी पाहत असाल. तरी हा पर्याय तूमच्या फायद्याचाच आहे. प्रत्येक दिवशी ८ ते १० डिलिव्हरीची संधी देऊन त्यांचं रोजचं उत्पन्न हे कमीत कमी ८४० रुपये असेल याची स्विगी नेहमी काळजी घेत असते.

पार्ट टाईमसाठी ही रक्कम प्रति दिवस ४२० रुपये इतकी ठरवलेली आहे. प्रत्येक दिवशी ८ ते १० डिलिव्हरीची संधी देऊन त्यांचं रोजचं उत्पन्न हे कमीत कमी ८४० रुपये असेल याची स्विगी नेहमी काळजी घेत असते. पार्ट टाईम साठी ही रक्कम प्रति दिवस ४२० रुपये इतकी ठरवलेली आहे.

पेट्रोल कंपनी देते का?

डिलिव्हरी बॉयसाठी पेट्रोलचा खर्च वेगळा दिला जातो का. असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. तर त्याचे उत्तर असे आहे की, कंपनी फकत पगार देते. पेट्रोलचा खर्च तुम्हाला तुमच्या पगारातून द्यावा लागतो.

Cotton Subsidy : कापूस व सोयाबीन पिकांचे 5 हजार मिळाले का? ऑनलाईन चेक करा तुमच्या मोबाईलवर

कापूस व सोयाबीन पिकांचे 05 हजार मिळाले का? ऑनलाईन चेक करा तुमच्या मोबाईलवर Cotton , Soyabean Subsidy : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात कापूस आण...