लवकरच CRPF मध्ये मोठी
भरती होणार आहे. या भरती मोहिमेद्वारे, कॉन्स्टेबल (जनरल
ड्यूटी) पदाच्या एकूण १.३० लाख जागांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.
गृह मंत्रालयाने या
संदर्भात नोटीस प्रसिद्ध केली आहे. मात्र, अर्ज सुरू
होण्याची आणि संपण्याची तारीख याबाबत अजूनही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. केंद्रीय
राखीव पोलीस दलातील ही पदे थेट भरतीद्वारे भरली जातील.
रिक्त
जागांचा तपशील :-
मंत्रालयाने प्रसिद्ध
केलेल्या नोटीसनुसार, कॉन्स्टेबलच्या एकूण १ लाख २९ हजार ९२९ जागांवर
भरती केली जाणार आहे. यापैकी १ लाख २५ हजार २६२ जागा पुरुष उमेदवारांसाठी तर ४
हजार ४६७ जागा महिला उमेदवारांसाठी आहेत.
यासोबतच माजी
अग्निवीरांसाठी दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. कॉन्स्टेबल पदावर माजी
अग्निविरांची नियुक्ती केली जाईल.
अर्ज कोण
करू शकतो ?
या पदांसाठी अर्ज करू
इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक
उत्तीर्ण केलेले असावे. त्यांच्या वयोमर्यादेबद्दल बोलायचे
झाल्यास १८ ते २३ वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. तपशीलवार माहिती
सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर मिळू शकते.
निवड कशी
होईल ?
या पदांसाठी उमेदवारांची
निवड शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि लेखी चाचणीद्वारे केली जाईल.
पुढील टप्प्यासाठी परीक्षा
उत्तीर्ण होण्यासाठी, उमेदवारांनी शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी
परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच ते
परीक्षेच्या पुढील टप्प्यात बसू शकतील.
इतका
पगार मिळेल .
या पदांसाठी प्रोबेशन कालावधी २ वर्षांचा असेल आणि या दरम्यान
त्यांना वेतन मॅट्रिक्सनुसार २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपये पगार मिळेल. अर्ज
सुरू होण्याच्या तारखांबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
सविस्तर नोटीस लवकरच
प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा आहे. कोणत्याही विषयावर तपशीलवार
माहिती मिळविण्यासाठी वेळोवेळी CRPF ची अधिकृत वेबसाइट crpf.gov.in
तपासत राहाणे गरजेचे आहे.
लवकरच आम्ही आपणांस तारीख कळवू.
No comments:
Post a Comment