Monday, July 29, 2024

इन्कम टॅक्स रिफंडचा स्टेटस कसा पाहाल? रिफंड कसा मिळवाल?

 जर करदात्याचा अतिरिक्त प्राप्तिकर कापला गेला असेल तर प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करून इ-व्हेरिफिकेशन (e-verification) केल्यानंतर ती रक्कम म्हणजे अतिरिक्त कापला गेलेला प्राप्तिकर करदात्याच्या खात्यात जमा होतो. यालाच आपण इन्कम टॅक्स रिफंड (Income Tax Refund) असं म्हणतो.

आपण टीडीएस किंवा टीसीएस किंवा अॅडव्हान्स टॅक्स किंवा सेल्फ असेसमेंट टॅक्सच्या रुपात जी अतिरिक्त रक्कम कर रुपाने प्राप्तिकर विभागाकडे जमा करतो, त्याबाबत प्राप्तिकर विभाग आपण प्राप्तिकर विवरणपत्र जमा केल्यानंतर त्याची आकेडमोड (कॅल्क्युलेशन) करतो. त्यानंतर अतिरिक्त रक्कम आपल्याला परत करण्याची प्रक्रिया केली जाते.

पण प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना जमा केलेली किंवा दाखवलेली सर्व प्रकारची कर वजावट किंवा डिडक्शन आणि कर सवलत लक्षात घेऊनच प्राप्तिकर विभाग आपल्यावरील प्राप्तिकराचे कॅल्क्युलेशन करत असतो.

करदात्यानं प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) जमा केल्यानंतर इ-वेरिफेकिशन (e-verification) केल्यानंतरच आपण जमा केलेला अतिरिक्त प्राप्तिकर परत होण्याची म्हणजेच रिफंडची प्रक्रिया सुरू होते.

प्राप्तिकर विभागाने त्यांच्या पोर्टलवर रिफंड संदर्भातील माहिती दिली आहे. त्यानुसार सर्वसाधारणपणे करदात्याने प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्यानंतर 4-5 आठवड्यात त्याच्या खात्यात इन्कम टॅक्स रिफंड जमा होतो, मात्र जर या कालावधीत तुमच्या खात्यात रिफंडची रक्कम जमा झाली नाही, तर तुम्ही तुमचे प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना काही चूक तर झालेली नाही ना, हे तपासलं पाहिजे.

प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना तुम्ही दिलेल्या ई-मेलवर प्राप्तिकर विभागाकडून रिफंडसंदर्भात काही सूचना किंवा नोटिफिकेशन तर आलं नाही हे तपासून घेणं गरजेचे आहे. बँक खात्यात रिफंडची रक्कम जमा होण्यास 4-5 आठवड्यांचा कालावधी लागतो.

त्याशिवाय इ-फायलिंग पोर्टलवर (eFiling portal) देखील करदाते त्यांच्या रिफंडचं स्टेटस (refund status) तपासू शकतात.

इन्कम टॅक्स विभागाच्या पोर्टलवर रिफंड स्टेटस तपासण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत-

  • योग्य युजर आयडी, पासवर्ड
  • आधार कार्डला लिंक्ड केलेला पॅन नंबर ( आधार क्रमांक किंवा पॅन क्रमांक वापरून या पोर्टलवर लॉगिन करता येतं)
  • रिफंडचा दावा करणारे प्राप्तिकर विवरणपत्र

रिफंड स्टेटस (refund status) कसे पाहावे?

  • इ-फायलिंग पोर्टलवर जा आणि लॉगिन वर क्लिक करा.
  • योग्य युजर आयडी आणि पासवर्ड टाका.
         युजर आयडी म्हणून पॅन नंबर किंवा आधार नंबरचा             वापर करता येतो.

जर एखाद्या करदात्यानं त्यांच्या पॅन नंबरला आधार नंबरशी लिंक केलं नसेल तर तिथे एक पॉप-अप मेसेज येतो.

आधार नंबरला पॅन नंबर लिंक न केल्यामुळे तुमचा पॅन नंबर तिथे वापरता येत नाही. म्हणजेच पॅन नंबरचा वापर करून लॉगिन करता येत नाही.

पॅन नंबर आधारशी लिंक करण्यासाठी लिंक नाऊ (Link Now) या बटणावर क्लिक करा.

जर तुमचा पॅन नंबर आधार नंबरशी आधीच लिंक झालेला असेल तर तुम्हाला तो पुन्हा लिंक करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे तुम्ही 'Continue' वर क्लिक करून पुढील स्टेपवर जाऊ शकता.

त्यानंतर 'Sevrvices' टॅबवर जा आणि तिथे 'Know Your Refund Status' येथे क्लिक करा.

तिथे तुम्हाला ज्या वर्षाच्या प्राप्तिकर विवरणपत्राच्या रिफंडचे स्टेटस तपासायचे आहे ते तुम्ही तपासू शकता.

तिथे ज्या असेसमेंट वर्षाचे रिफंड स्टेटस तपासायचे आहे ते असेसमेंट वर्ष निवडा. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा आपल्याला त्या ठिकाणी इन्कम टॅक्स रिफंड स्टेटस दिसेल.

जर तुमचा रिफंड देण्यात आलेला असेल तर तिथे असं दिसेल...


Note : 31 मार्च 2023 च्या आधीचे किंवा या दिवसाचे रिफंड स्टेटस तपासायचे असल्यास ते NSDL च्या वेबसाईटवर पाहता येईल.

रिफंडशी संबंधित सर्व प्रकारच्या शंकांचं निरसन करायचं असल्यास त्यासाठी रिफंड बँकरच्या (SBI) हेल्पलाइन नंबरवर कॉल करता येईल. त्यासाठी 18004259760 हा हेल्पलाइन नंबर आहे. जर तुमच्या बॅंक खात्याशी निगडीत काही अडचणी असतील तर तुम्ही बॅंकेच्या शाखेशी संपर्क करा.

रिफंडची रक्कम मिळण्यासाठी इ-फायलिंगच्या पोर्टलवर तुमच्या बॅंक खात्याची माहिती देण्यात आलेली असली पाहिजे. त्याचबरोबर IFSC Code, बॅंक खात्याचा क्रमांक, बॅंक खात्याशी निगडीत माहिती अपडेट केलेली असणं आवश्यक आहे.

Cotton Subsidy : कापूस व सोयाबीन पिकांचे 5 हजार मिळाले का? ऑनलाईन चेक करा तुमच्या मोबाईलवर

कापूस व सोयाबीन पिकांचे 05 हजार मिळाले का? ऑनलाईन चेक करा तुमच्या मोबाईलवर Cotton , Soyabean Subsidy : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात कापूस आण...